पिंप्राळा उड्डाण पुलाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी ना. रामदास आठवले यांना निवेदन

जळगांव महानगर रिपाई चे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना साकडे

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि ४ जानेवारी २०२४

पिंप्राळा उड्डाण पुलाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी ना. रामदास आठवले यांना निवेदन

       जळगांव महानगर रिपाई चे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना साकडे

जळगाव- केंद्रीय सामाजिक राज्य न्यायमंत्री मा.ना. रामदासजी आठवले यांनी जळगावात धावती भेट दिली असता अजिंठा शासकीय विश्राम गृह येथे रिपाई महानगराध्यक्ष मिलिंद सोनवणे व कार्यकर्त्यांनी ना. रामदासजी आठवले यांचे भव्य स्वागत केले.

यावेळी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. या वेळी शहरातील पिप्राळा येथील उड्डाण पुलाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांना दिले.

 

पे

या वेळी रिपाईचे राज्य उपाध्यक्ष रमेशजी मकासरे.रिपाई जिल्हाध्यक्ष जळगाव राजू सूर्यवंशी.लक्ष्मीताई मकासरे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच शहरातील रिपाईचे अविनाश पारधे, दिनेश सोनवणे, अजय सोनवणे.

भैय्या नन्नवरे, गुड्डू सपकाळे, गोलू सोनवणे, राजा सदानशिव, प्रवीण ससाने, आकाश वाघ, जानू सोनवणे, विजय पारधे, विशाल वारुळे, विकी पारधे, दादू अहिरे, सतीश सोनवणे, नासिर शेख, रिजवान काकर, मजीद बागवान, विनोद अहिरे, रितिक अहिरे व अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

हे वाचा

भारतीय संविधान गौरव दिन साजरा न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम