
वीर गुर्जर सेनेच्या प्रदेशध्यक्ष पदी किरण पाटील
वीर गुर्जर सेनेच्या प्रदेशध्यक्ष पदी किरण पाटील
जळगाव(प्रतिनिधी):- वीर गुर्जर सेनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार हेमंत पाटील यांनी रविवारी एका भव्य कार्यक्रमात सतखेडा तालुका धरणगाव येथील किरण संभाजी पाटील यांची वीर गुर्जर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती केली. सामाजिक बांधिलकी जोपासणारे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून किरण पाटील यांची ओळख आहे.माझी प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड केली त्या बद्दल त्यांनी आभार मानून, समाजातील मान्यवरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. समाजाला सोबत घेऊन विधायक व भूषणावह कार्य करण्याचे किरण पाटील यांनी बोलताना सांगितले. वीर गुर्जर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहायक नवल सिंह राजे पाटील, माजी जि प सदस्य गोपाल बापू चौधरी, ॲड विनोद पाटील, समाधान पाटील, शोभाताई पाटील, दै. बातमीदार चे मुख्य संपादक हेमंत पाटील, जेष्ठ पत्रकार मंगल बी पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, कवी व वक्ता प्रफुल पाटील, राजेंद्र चौधरी, प्रवीण पाटील, डॉ सुनील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्तींनी किरण पाटील यांचे अभिनंदन केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम