शंभर औषधी होणार स्वस्त : केंद्र सरकारचा मोठा निर्णय

औषधांच्या दर कमी होणार आहे

बातमी शेअर करा...

बातमीदार l बुधवार दि. २९ फेब्रुवारी २०२४
मुंबई ;– केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने अनेक औषधांचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ताप, संसर्ग, कोलेस्ट्रॉल, शुगरसह शंभर औषधे स्वस्त होणार आहेत. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. यामुळं औषधांच्या दर कमी होणार आहेत.

देशात आजारांवर उपचार करणे खूप महाग होत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोलेस्टेरॉल, शुगर, अंगदुखी, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह शंभर औषधे स्वस्त होतील. यामुळे लोकांचा आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होणार आहे.

नेमका नवीन निर्णय काय?

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत आणि 31 ची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. त्याबाबत अधिसूचना देखील जारी केली आहे. भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत फार्मास्युटिकल्स विभागाने ही अधिसूचना जारी केली आहे. कोलेस्टेरॉल, मधुमेह, वेदना, ताप, संसर्ग, अतिरक्तस्त्राव थांबवणे, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी 3, लहान मुलांसाठी अँटीबायोटिक्स यासह अँटीवेनम औषधेही स्वस्त होतील. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी अँटीवेनमचा वापर केला जातो.

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम