“शहराला हवा चेहरा नवा’, डॉ.अश्विन सोनवणे तुम आगे बढो..च्या घोषणांनी परिसर दणाणला !
सुप्रीम कॉलनी सह परिसरात मिळाला मोठा प्रतिसाद
जळगाव । प्रतिनिधी
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जोरदार प्रचार सुरु असून दि.१२ नोव्हबेर २०२४ रोजी शहरातील सुप्रिम कॉलनी,
रामेश्वर कॉलनी, मास्टर कॉलनी, दत्त नगर/अशोक किराणा, काशिनाथ लॉजचा मागच्या परिसरात प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला.
गेल्या आठ दिवसापासून त्यांच्या प्रचाराला वाढता प्रतिसाद मिळत असून, “शहराला हवा चेहरा नवा, डॉ.अश्विन सोनवणे तुम आगे बढो च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
शहरातील प्रत्येक गल्लीतून त्यांच्यासाठी समर्थन मिळत असून प्रचार रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतांना दिसत आहेत.
शहराच्या विविध परिसरात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या प्रचार रॅलीत नागरिकांचा जोश, कार्यकर्त्यांचा उत्साह वातावरणात नवी चैतन्याची लहर दिसून आली.
डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या उपमहापौरपदाचा अनुभव त्यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. उपमहापौरपदी असताना नेहमीच जळगाव शहरातील नागरिकांच्या समस्येसाठी पुढाकार घेऊन प्रश्न सोडविले आहे.
त्यामुळे जळगावकरांच्या मनात विश्वास आणि समर्थन वाढले आहे.
यांची होती उपस्थिती
रामचंद्र कोळी, सजु सपकाळे, बुरा कोळी, युवराज कोळी, योगेश सोनवणे, योगेश कोळी, सोनु कोळी, शाम सुर्वे, राहुल कोळी, किरण तीतरे, कोमल सोनवणे, नवल सोनवणे, सागर पाटील, पपू कोळी, अजय पाटील, अशोक कोळी
हे ही वाचा👇
डॉ. अश्विन सोनवणे यांना नागरिकांनी मारली प्रेमाची मिठी !
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम