शिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतापराव पाटलांच्या हस्ते प्रतिमापूजन !
सभागृह मंजूर ; माळी समाज बांधवांनी मानले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार !
शिरसोली येथे संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतापराव पाटलांच्या हस्ते प्रतिमापूजन !
सभागृह मंजूर ; माळी समाज बांधवांनी मानले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार !
जळगाव l प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली येथे संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी माळी समाजासाठी सभागृह मंजूर करून दिल्याबद्दल माळी समाज बांधवांनी स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील यांचे आभार मानले.
याप्रसंगी माजी उपसरपंच प्रणय सोनवणे, माळी समाज अध्यक्ष बबलू माळी, अर्जुन माळी, सोनू माळी, श्रावण माळी, संजय महाजन, गंगाराम महाजन, बापू मराठे, उमाजी पानघडे, रामकृष्ण कटोले, शेणपडू आबा पाटील आदी उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम