शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरी सत्कार

जळगावमध्ये २५० कोटींचे विभागीय क्रीडा संकुल; उभारणीची प्रक्रिया सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते नागरी सत्कार

जळगावमध्ये २५० कोटींचे विभागीय क्रीडा संकुल; उभारणीची प्रक्रिया सुरू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

▪️ ग्रामीण भागासाठी १४ लाखांचे क्रिडांगण अनुदान; होतकरू खेळाडूंना मिळणार बळ

जळगाव– जळगाव जिल्ह्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागली असून, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यंदा जिल्ह्यातील पाच खेळाडूंना राज्यस्तरीय सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळाल्याचा अभिमान असून, २५० कोटी रुपये खर्चून जळगावमध्ये विभागीय क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागातही १४ लाख रुपये निधीतून क्रिडांगणांची उभारणी होणार असून, त्यामुळे नवोदित खेळाडूंना संधी उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संघटन महासंघ, व शारीरिक शिक्षण महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव समारंभ ४ मे रोजी पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

*गाव तिथे व्यायामशाळा व क्रीडा संकुल उभं करण्याचा शासनाचा निर्धार असून, आमदार राजूमामा भोळे यांनी मांडलेल्या मागणीनुसार जिल्ह्यातील क्रीडा संकुलांचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.*

आ. भोळे यांनी जिल्ह्यात वाढणाऱ्या क्रीडा संस्कृतीबद्दल आनंद व्यक्त करत सर्व पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले.

*पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा गौरव*

*शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2022-23 आणि 2023-24 या वर्षांसाठी प्राप्त झालेले खेळाडू:*

*सॉफ्टबॉल* – श्री. जयेश मोरे, कुमारी नेहा नितीन देशमुख, श्री. प्रीतिश रमेश पाटील

*कॅरम* – श्री. अभिजित त्रिपणकर, श्री. संदीप दिवे, श्री. योगेश ढोंगळे

*बेसबॉल* – कुमारी रेखा पूना धनगर

*योग* – डॉ. शरयू विसपूते (एशियन योग स्पर्धेत सुवर्णपदक) सर्वांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

*क्रीडा क्षेत्रातील पीएच.डी. धारकांचा सन्मान*
जिल्ह्यातील क्रीडा शिक्षण क्षेत्रात पीएच.डी. मिळवणाऱ्या २८ मान्यवर प्राध्यापक व शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

*युवा पुरस्कारप्राप्त सन्मानार्थी:*
जिनल जैन, मोनाली कुमावत, गोपाल दर्जी, तेजस पाटील, नरेद्र पाटील, अनिल बाविस्कर, शुभागी फासे, अविनाश जावळे, सागर कोळी आणि विलास नारखेडे यांचा देखील गौरव करण्यात आला.

*कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती*
यावेळी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. राजू मामा भोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, माजी महापौर ललित कोल्हे, क्रिडा महासंघाचे उपाध्यक्ष नारायण खडके, श्याम कोगटा, जनता बँकेचे चेअरमन सतीश मदाने, माजी कुल सचिव संभाजी देसाई, प्रदीप तळवळकर, एजाज मलिक, महीला जिल्हा प्रमूख सरिताताई कोल्हे, अजय देशमुख, क्रिडा रसिक क्लबचे ऍड. रोहन बाहेती, योगेश मांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॉफ्ट बॉल संघटनेचे राज्य क्रीडा सचिव प्रदीप तळवेलकर यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री. रवींद्र नाईक (जिल्हा क्रीडा अधिकारी) यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जयंत जाधव, अरुण श्रीखंडे, विनोद माने, विनोद कुलकर्णी व अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम