
शिवसेना सोशल मीडिया जळगाव जिल्हा प्रमुखपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती
शिवसेना सोशल मीडिया जळगाव जिल्हा प्रमुखपदी शिवराज पाटील यांची नियुक्ती
जळगाव प्रतिनिधी शिवसेना पक्षाचे सर्वोच्च नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार . डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे , पालकमंत्रीगुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील , शिवसेना सोशल मीडिया राज्य प्रमुख राहुलदादा कनल, उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा व उत्तर महाराष्ट्र प्रमुख मयूरदादा मगर पाटील यांच्या सहमतीने शिवराज पाटील यांची शिवसेना सोशल मीडिया जळगाव जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त करताना शिवराज पाटील म्हणाले की “शिवसेना पक्षाच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्याचे वचन देतो. पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.
या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेना सोशल मीडिया कार्याला नवे चैतन्य प्राप्त होईल आणि तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडली जाणार, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम