
शेजारील दुकानदाराची दादागिरी: ग्राहक वळविल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात मारले माप
शेजारील दुकानदाराची दादागिरी: ग्राहक वळविल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात मारले माप
कासमवाडीतील घटना; दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी l शहरातील कासमवाडी परिसरात ग्राहक वळविल्याच्या वादातून शेजारील दुकानदाराने नवीद अकिल खाटीक या तरुणाच्या डोक्यात एक किलोचे लोखंडी माप मारल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना १० मे रोजी घडली असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासमवाडी परिसरात नवीद खाटीक यांचे किराणा दुकान आहे. त्यांच्या शेजारी असलेल्या दुकानदाराला नवीद यांच्याकडे ग्राहक येत असल्याचा राग आला. १० मे रोजी हा दुकानदार नवीद यांच्या दुकानात आला आणि “तुम्ही आमचे ग्राहक वळवले, तुम्हाला जास्त झाले आहे,” असे म्हणत रागाच्या भरात एक किलो वजनाचे लोखंडी माप नवीद यांच्या डोक्यात मारले. यात नवीद यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
या घटनेनंतर आणखी एक व्यक्ती तिथे आली आणि तिने नवीद आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. या दोघांनी मिळून खाटीक कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे. या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
नवीद खाटीक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोहेकॉ संजीव मोरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम