बातमीदार | सोमवार दि. 26 फेब्रुवारी 2024
धानोरा गावात स्वतः कष्टातून केली शेतीसमृद्ध; राज्य सरकारने दिला पुरस्कार
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार साठी रज्जाक तडवी यांना घोषित
धानोरा ता. चोपडा – मन्सूर तडवी
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील सरपंच रज्जाक अमीर तडवी यांनी निसर्गावर मात करून कबाड कष्ट करून बदलत्या हवामान बेमोसमी पाऊस, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष व विजेची कमतरता
यावर मात करीत कायमस्वरूपी तोडगा काढत संकटातून शेतीला समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेत रान हिरवे करण्यावर भरच दिला आणि त्यांच्या कष्टाची दखल घेऊन
https://www.facebook.com/share/p/5bYF56Sp3NFbPxbD/?mibextid=oFDknk
राज्य सरकारच्या वतीने सन 2022 च्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार साठी रज्जाक तडवी यांना घोषित करण्यात आले. सरपंच रज्जाक अमीर तडवी हे शेतीला आपली आई म्हणून तिची सेवा करीत असतात.
नव नवीन तंत्रज्ञानाची जोड देत त्यांनी शेतीला समृद्ध करण्यावर भरच दिला ते आणि घरातील सदस्य दिवस रात्र शेतीत राबत असतात त्यातूनच त्यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग करून उत्कृष्ट शेती केली आहे.
याची दखल राज्य सरकारने घेऊन त्यांना पुरस्कार जाहिर केला. रज्जाक तडवी हे राजकारण असो की समाजकारण ते नेहमीच कमालीचे सक्रिय असतात. समाजातील अडल्या-नडल्या माणसाला मदत करणे नियमित समाजातील समस्या सोडवीत असतात.
परिसरात त्यांची ओळख एक दिलदार माणूस नेहमी हसमुख चेहरा हा त्यांच्या स्वभाव असून परिसरात त्यांना रज्जाक मेंबर या नावाने ते परिचित आहेत.
से
त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. सरपंच रज्जाक तडवी यांनी धानोरा गावात खूप कमी कालावधीत गावात विकास कामे करून एक विकास पुरुष म्हणून तालुक्यात ठसा उमटविला आहे.
तसेच शेती समृद्ध झाली तर अन्नधान्याची वाढीव गरज पूर्ण होण्यास हातभार लागणार आहे.
विविध प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी शेतीचे सोने केले. काळ्या आईची सेवा हेच आपले कर्तव्य आहे, असे ते मानतात. शासनाने पुरस्कार दिल्याबद्दल ते राज्य सरकारचे आभारी आहेत.
हे ही वाचा👇
सत्कार – अंबरनाथ चे नगर रचनाकार विवेक गौतम यांचा रोटरी तर्फे भव्य सत्कार
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम