
शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी : शेत रस्त्यांच्या प्रश्नांवर तहसीलदारांसोबत शिवपानंद चळवळीची बैठक
शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी : शेत रस्त्यांच्या प्रश्नांवर तहसीलदारांसोबत शिवपानंद चळवळीची बैठक
धरणगाव, प्रतिनिधी – शिवपानंद शेत रस्ते चळवळ अंतर्गत “शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी” या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांच्या रस्त्यांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी धरणगाव येथे आज, दिनांक ५ जून २०२५ रोजी नायब तहसीलदार संदीप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शेत रस्त्यांबाबत उद्भवलेल्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नायब तहसीलदार मोरे यांनी सर्व समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या व त्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिले. यापुढे रस्ते मोजणी करताना पोलिस संरक्षण, भूमिलेख विभागाचे अधिकारी तसेच मंडळ अधिकारी उपस्थित राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी चळवळीचे राज्य प्रणेते शरदराव पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव तालुक्याचे कृती समिती सदस्य प्रेमराज पाटील, श्री. मनिलाल पाटील, श्री. किशोर पाटील, जे. टी. पाटील, नवल मिस्तरी, श्याम पाटील, किशोर कोल्हे, आनंदा चौधरी, रतिभान पाटील यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम