श्रमसंस्कार शिबिर – एच जे थीम कॉलेज मध्ये २४ जानेवारी पर्यंत श्रमसंस्कार शिबिर

'उर्जा बचत-काळाची गरज' या विषयावर व्याख्यान संपन्न

बातमी शेअर करा...

बातमीदार | दि २० जानेवारी २०२४

एच जे थीम कॉलेज मध्ये २४ जानेवारी पर्यंत श्रमसंस्कार शिबिर

‘उर्जा बचत-काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान संपन्न

जळगांव – येथील इकरा शिक्षण संस्थेच्या एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दिनांक १८ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान जिल्हा परिषद कन्या शाळा क्रमांक ०१ नशिराबाद येथे करण्यात आले.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात शाळेच्या आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि मुख्याध्यापकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

श्रमसंस्कार शिबिर

दुपारच्या दुसऱ्या सत्रात ‘उर्जा बचत-काळाची गरज’ या विषयावर भूषण गॅस एजन्सी चे संचालक भूषण चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भुषण चौधरी यांनी पारंपरिक आणि अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर कसा करावा,

उर्जेचा वापर काटकसरीने कसा करावा, स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर आणि शेगडी हाताळणी कशी करावी हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.

तसेच उर्जा बचत काळाची गरज कशी आहे आणि त्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी शेख सायमा यांनी केले. या प्रसंगी

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.तनवीर खान डॉ.सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.शेख हाफिज आणि डॉ.अंजली कुलकर्णी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निदा शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

हे ही वाचा👇

हॉलीबॉल स्पर्धा – प्रताप विद्यामंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम