चोपडा l प्रतिनिधी
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात तृतीय वर्षीय विद्यार्थ्यासाठी दिनांक ०५ जुलै ते १० ऑगस्ट २०२३ पर्यंत अंतर्गत निसर्गातील विविध औषधी वनस्पतींचा अभ्यास तसेच हर्बेरियम प्रशिक्षणाचे (Herbarium Technology and Methodology ) आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणा अंर्तगत विद्यार्थ्यांना निसर्गातील निरनिराळ्या औषधी वनस्पतींची नावे, वनस्पती मध्ये असणारे घटक व त्यांचा औषधी गुणधर्म समजावून सांगण्यात आले. तसेच निसर्गातील दुर्मिळ वनस्पती, नवीन वनस्पती व जैवविविधता जोपासने हा या प्रशिक्षणाचा उद्देश होता व तो प्रशिक्षणा दरम्यान साधला गेला.
या प्रशिक्षणात महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील तृतीय वर्षातील ११० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तसेच दिनांक १७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२३ रोजी विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
२५ ऑगस्ट २०२३ या दिवशी सहभागी व उत्तीर्ण झालेल्या सर्व ११० विद्यार्थ्यांना हर्बेरियम प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यातआले. सदरहू या प्रशिक्षणाच्या आयोजनाला संस्थेचे अध्यक्ष अँड. संदिप सुरेश पाटील, उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील, सचिव सौ.डॉ.स्मिताताई पाटील व प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच प्रा.डॉ एम. डी. रागीब नॅक समन्वयक (NAAC Coordinator), प्रा.डॉ. सौ. सुवर्णलता महाजन IQAC Coordinator आणि प्राध्यापक तसेच हर्बेरियम प्रशिक्षण समन्वयक कु. कांचन गोपाल पाटील यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रबंधक प्रफुल्ल मोरे व सर्व विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम