श्री रामायण – माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या वतीने आजपासून श्री रामायण संगीत कथा सप्ताह चे आयोजन

शिवाजी नगर मधील भुरे मामलेदार परिसरातील धार्मिक सप्ताह चे भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...

बातमीदार | गुरुवार दि 21 मार्च 2024

माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या वतीने आजपासून श्री रामायण संगीत कथा सप्ताह चे आयोजन

शिवाजी नगर मधील भुरे मामलेदार परिसरातील धार्मिक सप्ताह चे भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगांव – येथील शिवाजी नगर मधील माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या वतीने सालाबादप्रमाणे सलग 5 व्या वर्षी ह भ प प्रा. मनोज महाराज कुलकर्णी पिंप्राळेकर ( जळगांव) यांच्या

सुमधुर वाणीतून संगीतमय श्री रामायण कथा सप्ताह चे आजपासून 28 मार्च पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. याचा परिसरातील भक्त भाविकांनी लाभ घ्यावा

श्री रामायण

असे आवाहन नवनाथ दारकुंडे, ज्योत्स्ना दारकुंडे, किशोर बाविस्कर व उज्वला बाविस्कर यांनी केले आहे.

 या बाबत सविस्तर माहिती अशी की, शिवाजी नगर मधील भुरे मामलेदार प्लॉट या परिसरातील मनपा गार्डन जवळ माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या घराजवळ

https://www.facebook.com/share/p/1BZDtG5MvYKAWVC6/?mibextid=oFDknk

आज गुरुवार दि 21 मार्च पासून संगीतमय श्री रामायण कथा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा नुसार गुरुवारी दुपारी 2 ते 6 वाजे दरम्यान श्री सुत शौनक भेट – राम नाम महात्मा, श्री राम वंशावळी,

शुक्रवार दि 22 मार्च रोजी खटवांग कथा, सत्यवादी हरिश्चंद्र कथा, अजराजा कथा, श्रावण बाळ चरित्र, श्रीरामाचा जन्म, हनुमान जन्म,

शनिवार दि 23 रोजी श्रीरामाचा हट्ट, शिव – श्रीराम भेट, सीता जन्म, वाटिका वध, अहील्योद्धार तर सुंदरकांड रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत,

रविवार दि 24 रोजी स्वयंवर लग्न, कैकेयीचे दशरथाला वर मागणे, दशरथ मृत्यू,

सोमवार दि 25 रोजी भरत भेट, केवट चरित्र, शुर्पनखा गर्वहरण, सीताहरण, शबरी भेट

मंगळवार दि 26 रोजी हनुमंत भेट, बाली वध, सेतू बंधन, अंगदाकडून रावण गर्वहरण,बिभीषण उपदेश, युद्ध प्रारंभ, लक्ष्मण मूर्च्छा, दोर्णगिरी पर्वत आणणे, कीर्तन ( देवी महात्म्य )  रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत,

बुधवार दि 27 रोजी इंद्रजित वध, कुंभकर्ण वध, अहिरावन चरित्र, रावण वध, सीता परीक्षा, लव – कुश चरित्र व समाप्ती,

गुरूवार दि. 28 मार्च रोजी दुपारी 12 ते 3 वाजता काल्याचे कीर्तन, दुपारी 2 ते 4 वाजता फेटे बांधणे,

दुपारी 4 ते 6 वाजता तिथीप्रमाणे छ. छत्रपती शिवाजी महाराज व श्री भागवत ग्रंथ मिरवणूक तर सायंकाळी 7 ते 10 वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या श्री रामायण संगीतमय सप्ताह कार्यक्रमाचा परिसरातील भक्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, ज्योत्स्ना दारकुंडे ( अध्यक्षा – गुरुमाऊली महिला बहुउद्देशीय संस्था ), माजी नगरसेवक किशोर बाविस्कर, उज्वला बाविस्कर ( अध्यक्षा – लतामाई प्रतिष्ठान ) यांनी केले आहे.

हे ही वाचा👇

पशुपतीनाथ – महाशिवरात्री निमित्त पशुपतीनाथचे रुद्राक्ष वाटप

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम