श्री बालाजी पेठ मित्र मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ
माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव / प्रतिनिधी
श्री बालाजी पेठ मित्र मंडळाच्या वतीने 2024 या वर्षी नवरात्रोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवशाही ते लोकशाही’ या विषयावरील लघुनाट्य स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ 29 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम रविवारी संध्याकाळी 6 वाजता श्री बालाजी पेठ मित्र मंडळ कार्यालय, समोरील चौक, सराफ बाजार, जळगाव येथे होणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदे गटाचे जळगाव लोकसभा क्षेत्र प्रमुख तसेच अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, डॉ. इंद्रायणी आयुष प्रसाद, आ.प्रा.चंद्रकांत अण्णा सोनवणे, आ. सुरेश उर्फ राजू मामा भोळे, दै. बातमीदारचे मुख्य संपादक हेमंत पाटील,
भाजप महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, माजी महापौर सिमाताई भोळे, स्त्री शक्तिपीठ पुरस्कार प्राप्त कु. प्राजक्ता सोनवणे, मनपा स्थायी समितीच्या माजी सभापति अँड सौ. सुचिता हाडा, शिवसेना उबाठा गटाचे महानगर प्रमुख शरद तायडे व अन्य मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक श्री बालाजी पेठ मित्र मंडळाचे संसथापक अध्यक्ष मुकुंद ठाकूर, संस्थापक कार्याध्यक्ष किशोर भुतडा आणि गणेशोत्सव समितीचे कमलेश प्रजापति व आकाश शिरसाळे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा👇
अंबरनाथ: घरपट्टी खात्यातील समस्यांमुळे नागरिक त्रस्त, माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ चौधरी यांची तक्रार
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम