श्री संत नरहरी सोनार पालखी सोहळा मोठ्या उत्साहात

संत नरहरी महाराज यांचा ७३८ वा पुण्यतिथि महोत्सव

बातमी शेअर करा...

बातमीदार l बुधवार दि. २८ फेब्रुवारी २०२४

जळगाव ;- संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्था जळगाव आयोजित सालाबाद प्रमाणे यंदाही संत नरहरी महाराज यांचा ७३८ वा पुण्यतिथि महोत्सव कार्यक्रम निमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रारंभी संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन संस्थेचे अध्यक्ष .रमेशभाऊ वाघ व सौ. मीना वाघ यांचे हस्ते करण्यात आले.. यावेळी प्रशांत सोनार मा. अध्यक्ष जगदिश देवरे सचिव जिवन सोनार उपाध्यक्ष,सुनील सोनार खजिनदार, राजेश बिरारी,यशवंत वडनेरे,पुरुषोत्तम सोनार ,केतन सोनार,नितीत्न बिरारी,समाधान सोनार यांचे हस्ते सामुहिक पालखी पूजन करण्यात आले. पालखी सोहळ्यास सुरूवात करण्यात आली.

यावेळी गणेश सोनवणे,रंजना वानखेडे, राजेंद्र घुगे पाटील,विजय वानखेडे,गणेश दापोरेकर,संजय विसपुते,नंदू बागुल,व उपस्थित समाजबांधव यांच्या हस्ते सामुहिक महा आरती करण्यात आली.

यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. मिरवणुकीच्या अग्रभागी नरहरी रथ,पालखी,भजनी मंडळ होते रस्त्यात समाजबांधवानी आरती तसेच मिरवणुकी वर पुष्पवृष्टी केली तसेच महिलांनी फुगडी खेळून स्वागत केले. सदर कार्यक्रमासाठी हर्षल बिरारी,गणेश देवरे,दिलीप पिंगळे,प्रमोद सोनार,दिगंबर निकम यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम