सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री !

एसटीच्या तिकिट दरांमध्ये १५ टक्केंनी वाढ

बातमी शेअर करा...

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री I
एसटीच्या तिकिट दरांमध्ये १५ टक्केंनी वाढ
मुंबई I वृत्तसंस्था

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या बसेसने प्रवास करणे आता महाग झाले आहे. कारण, एसटी महामंडळाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. एसटी बसची तिकीट दरवाढ आजपासून लागू झाली आहे. यामुळे आता लालपरीचा प्रवास महाग झाला आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.एसटीच्या तिकिट दरांमध्ये १५ टक्केंनी वाढ झाली आहे.

एसटी महामंडळाकडून उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ कऱण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. गुरुवारी झालेल्या मंत्रालयातील राज्य परिवहन प्राधिकराणाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून नवीन दरवाढ लागू होण्याची शक्यता आहे. नवीन दरवाढ झाल्यानंतर एसटीचा प्रवास सरासरी ७० ते ८० रूपयांनी महागणार आहे. १०० रूपयांचे तिकीट आता ११५ रूपयांना मिळेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम