
सानेगुरूजी संस्कार केंद्रातर्फे साने गुरूजींचा विचारांवर आधारीत लघुपट स्पर्धा
स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतरही सर्व नागरिकांसाठी खुली
सानेगुरूजी संस्कार केंद्रातर्फे साने गुरूजींचा विचारांवर आधारीत लघुपट स्पर्धा
स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतरही सर्व नागरिकांसाठी खुली
जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळे अंतर्गत असलेल्या पूज्य सानेगुरूजी संस्कार केंद्रातर्फे साने गुरूजींचा विचारांवर आधारीत लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतरही सर्व नागरिकांसाठी खुली आहे. लघुपटाचा कालावधी पाच ते दहा मिनिटे असावा. लघुपटासाठी सात विषय देण्यात आले आहेत. त्यामध्ये १) मातृहृदयी साने गुरूजी, २) मानवतावादी साने गुरूजी, ३) समाजवास्तव आणि मानवतावाद, ४) माणूस, माणूसकी आणि मानवतावाद, ५) साने गुरूजींच्या साहित्यातील करूणाभाव, ६) साने गुरूंजींचे जीवन व कार्य, ७) साने गुरूजींच्या कथा : आजच्या काळातील प्रासंगिकता या विषयांचा समावेश आहे. लघुपटाच्या संचिकेचे स्वरूप HD- Quality (750p / 1080p) आणि Mp4 स्वरूप असावे. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत उपशिर्षके असावित स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. भाग घेणाऱ्यांनी प्रारंभी rohankoshti5@yahoo.co.in या मेलवर माहिती कळवावी. परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील. २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत लघुपट पाठविता येईल. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रू. ७५००, द्वितीय – रू. ५०००, तृतीय – रू. ३०००, उत्तेजनार्थ (दोन) रू. १५००. अधिक माहितीसाठी 8055331264 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. रोहन कोष्टी यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम