सावदा येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ ; सुमारे 500 जणांनी केली नोंदणी

बातमी शेअर करा...

सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथे दि 5 जानेवारी 2025 पासून भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानास येथील संभाजी चौकातून सुरवात करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, नगराध्यक्षा सौ हेमांगी चौधरी, नगरसेविका रंजना भारंबे, नंदाबाई लोखंडे, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, बेटी बचावच्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, भाजपा शहर सरचिटणीस महेश अकोले, संतोष परदेशी, सचिन ब-हाटे, यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नागरिकांना बारकोड व्दारे तसेच भाजपा ने जारी केलेल्या लिंक व्दारे तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 8800002024 यावर मिस कॉल देवून भाजपा सदस्य नोंदणी करण्यात आली दिवसभरात सुमारे 500 जणांनी सदस्य नोंदणी करून सदस्यत्व स्वाकरले येत्या काही दिवसात आणखीन हा आकडा वाढून शहरात सुमारे 5000 हजार सदस्य करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले, दरम्यान भाजपा पूर्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. अमोलभाऊ जावळे, मा. जी.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, यांचे सह मान्यवरांनी या नोंदणी अभियानास भेटी दिल्या, शहरातील नागरिकांचा देखील यास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम