सावदा शहरात बनावट नोटा प्रकरणी 2 जणांना अटक; 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

सावदा पोलिसांची यशस्वी कारवाई

बातमी शेअर करा...

सावदा शहरात बनावट नोटा प्रकरणी 2 जणांना अटक; 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

सावदा पोलिसांची यशस्वी कारवाई

सावदा । प्रतिनिधी

शहरात पोलिसांनी बनावट नोटांचा बाळगणाऱ्याचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी दोन जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी सावदा शहरात दोन इसमांकडे भारतीय बनावटीच्या चलनी नोटा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर

https://www.facebook.com/share/p/1HRLcdfvJw/

पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना या माहितीच्या आधारावर त्यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे

सावदा

यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करून सापळा रचत संशयित आरोपी शेख आरिफ शेख फारूक, अझरखान अयुब खान दोघे राहणार सावदा यांना चलनी नोटांसह अटक करण्यात आली आहे.

सावदा

तसेच आरोपींचा सहकारी असलेल्या एका व्यक्तीच्या शोधात पोलीस पथक तैनात करण्यात आले असून सदर प्रकरणाचा सखोल तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे, हे करीत आहेत.

यांचा होता पोलीस पथकात सहभाग
पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, सहाय्यक फौजदार संजय देवरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव चौधरी, उमेश पाटीलय, शवंत टहाकळे, किरण पाटील, पोलीस नामदार निलेश बाविस्कर यांचा समावेश होता.

37 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
संशयित आरोपी यांचे कडून भारतीय बनावटीच्या 100 रुपये प्रमाणे दिसणाऱ्या चलनी नोटा व एक मोटरसायकल असा एकूण 37 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलीस ठाण्यातर्फे ताब्यात घेण्यात आला आहे.

हे हि वाचा👇

बाजार समितीचा सेस न भरल्यामुळे व्यवसायिकास ११ हजारांचा दंड

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम