
सावदा प्रीमियम लीग मध्ये रावेर येथील के जी एन संघ विजयी
सावदा इलेव्हन उपविजयी
सावदा प्रतिनिधी
सावदा येथील आ.गं. हायस्कुलचे मैदानावर एक दिवसीय सावदा प्रीमियम लीग स्पर्धा दि 1 जानेवारी रोजी संपन्न झाल्या
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सावदा येथील सावदा इलेव्हन व रावेर येथील के जी एन या संघात लढत झाली यात रावेर येथील के जी एन संघाने 82 धावा केल्या तर सावदा संघ सावदा संघ 75 धावा वर ऑल आऊट होऊन पराभूत झाला व रावेर येथील के जी एन संघ अंतिम विजेता ठरला व सावदा इलेव्हन उपविजेता राहिला, या स्पर्धेचे प्रथम बक्षीस 21000/- हे सावदा येथील गजुभाऊ ठोसरे यांचे कडून तर उपविजेता द्वितीय बक्षीस 11000/- हे अदनान भाई यांचे कडून देण्यात आले
या स्पर्धेचे बक्षीस वितरण दि 2 रोजी संपन्न झाले यावेळी समाजसेवक गजुभाऊ ठोसरे, सावदा स.पो.नि. विशाल पाटील, मा. नगरसेवक राजेंद्र चौधरी अदनान भाई आदी मान्यवरांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघास बक्षीस वितरण करण्यात आले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम