बातमीदार | दि ३ जानेवारी २०२४
सुनील भाऊ चौधरी ७ जानेवारीला जिल्हा दौऱ्यावर अंबरनाथ येथील माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक व जळगांव लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सुनील भाऊ चौधरी हे जळगांव जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीसाठी जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, सुनील भाऊ चौधरी हे दि. ७ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी जळगांव जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्र निहाय व लोकसभा क्षेत्रातील
भारतीय संविधान गौरव दिन साजरा न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
तालुका प्रमुख, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, जि प सदस्य, माजी आमदार, विद्यमान आमदार, इच्छुक उमेदवार व प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक अजिंठा विश्रामगृह येथे ७ जानेवारी १० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार आहे अशी माहिती जिल्हा प्रमुख निलेश पाटील यांनी दिली आहे.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम