
सुप्रसिध्द नृत्यकार व संगीताचार्य डॉ. स्वाती दैठणकर यांचे नृत्यप्रयोग या विषयावर व्याख्यान
विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागातर्फे आयोजन
सुप्रसिध्द नृत्यकार व संगीताचार्य डॉ. स्वाती दैठणकर यांचे नृत्यप्रयोग या विषयावर व्याख्यान
विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागातर्फे आयोजन
जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाच्या वतीने भरत नाट्यमच्या सुप्रसिध्द नृत्यकार व संगीताचार्य डॉ. स्वाती दैठणकर यांचे नृत्यप्रयोग या विषयावर व्याख्यान झाले.
यावेळी जळगावच्या पायल संगीत व नृत्यालयाचे संचालक संजय पवार, अधिसभा सदस्य नेहा जोशी, आंतरविद्या शाखा अभ्यास प्रशाळेच्या संचालक डॉ. मनीषा इंदाणी, योगशास्त्र विभागप्रमुख इंजि. राजेश पाटील यांची उपस्थिती होती. डॉ. स्वाती दैठणकर म्हणाल्या की, प्राचीन भारतीय परंपरेतील नृत्य व योग आणि अध्यात्मिकता यांचे एकत्रिकरण म्हणजे नृत्य योग होय. महर्षि पंतजली यांनी लिहिलेल्या पांतजल योगसूत्र व भरत नाट्यम मधील प्रत्येक हालचाली एकरूपता दिसून येते. यावेळी त्यांनी भरतनाट्यम मधील चतुरस्त्र शरीरस्थिती, हस्त, आकृतीबंध, अभिनय, ताल आणि लय या प्रत्येक गोष्टीचे योगाशी असलेले साम्य प्रात्यक्षिक दर्शवित मनोरंजन पध्दतीने उलगडून दाखविले. यावेळी डॉ. लिना चौधरी यांनी ओंकारप्रार्थना सादर केली. प्रा. गितांजली भंगाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. लिन्ता चौधरी यांनी आभार मानले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम