सेंट्रल बँकेचे एटीएम दोन महिन्यापासून बंद

सेंट्रल बँकेचे एटीएम दोन महिन्यापासून बंद, एटीएम मध्ये खळखळाटमुळे ग्रामस्थांची नाराजी कजगाव ता भडगाव येथील एकमेव राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या सेंट्रल बँकेचे एटीएम हे तब्बल दोन महिन्यांपासून बंद असल्याने एवढ्या मोठ्या बँकेचे एटीएम तब्बल दोन महिने पासून बंद असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे तर एटीएम मधील मशीन व बरेच साहित्य हे बँक प्रशासनाने काढून घेल्याचे दिसून येते त्यामुळे हे एटीएम कायमस्वरूपी बंदच्या तयारीत तर नाहीना?असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे दोन महिन्यापासून एटीएम मध्ये पैसे नसल्याने जनसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे सध्या मोठ्या प्रमाणावरील लोकांकडे पैसे काढण्यासाठी एटीएम आहे बँकेने ही ग्राहकांना त्वरित सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून एटीएम वापराकडे जास्त कल दाखवला मात्र जे एटीएम नागरिकांच्या सुविधेसाठी आहे त्यात दोन महिन्यापासून पैसेच नसल्याने एटीएम वापरणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे बँक समोरील गर्दी कमी व्हावी म्हणून रांगेत उभे राहण्यापेक्षा एटीएम जास्त सोयीचे असल्याने नागरिक एटीएमला प्रथम प्राधान्य देत असतात मात्र एटीएम मध्ये गेल्यावर पैसेच नसल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेल्या एटीएम ला त्वरित दुरुस्त करून त्यात नेहमी पैसे उपलब्ध करण्याची सोय त्वरित करण्यात यावी अशी मागणी जोरदार होत आहे "":सरकारी एटीएम ला खाजगी एटीएम भारी गावात दोन एटीएम असून एक सेंट्रल बँक ऑफ इंडिया चे तर एक खाजगी कंपनीचे एटीएम मशीन आहे मात्र ह्या दोघांपैकी एक असलेल्या सेंट्रल बँकेचे एटीएम हे बँकेला लागूनच असल्यानंतरही ते बंद आहे दोन महिन्यांपासून तेथे पैसेच नसतात तर बस्थानक परिसरात असलेल्या खाजगी एटीएम मध्ये नेहमी पैसे उपलब्ध असल्याने सरकारी एटीएम ला खाजगी एटीएमच भारी असल्याचा सूर व्यक्त होत आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम