सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता

प्रलंबित ओव्हरटाईमची प्रकरणे त्वरित निकाली काढण्याची तयारी

बातमी शेअर करा...

सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता

प्रलंबित ओव्हरटाईमची प्रकरणे त्वरित निकाली काढण्याची तयारी

जळगाव I प्रतिनिधी

वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर सेवानिवृत्त कर्मचारी सुनिल भोळे यांचे १० वर्षापासुन प्रलंबित ओव्हरटाईम चा विषया संबधी उपोषण २२ जानेवारी रोजी सुरू केले होते. प्रशासनाच्या वतीने संघटनेला चर्चेसाठी पाचारण केले सकारात्मक चर्चा होवून प्रशासनाने प्रलंबित ओव्हरटाईमची प्रकरणे त्वरित निकाली काढण्याची तयारी दाखवून प्रश्न निकाली काढल्या मुळे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या वतीने अधिक्षक अभियंता अनिल महाजन यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्या सेवानिवृत्त कर्मचारी यांना लिंबू पाणी देऊन आंदोलनाची सांगता झाली.उपऔद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे यांनी संघटना व प्रशासन यांच्यामधे चर्चा घडवून आणली.
संघटनेच्या वतीने सुरेश सोनार,सचिन पाटील,ज्ञानेश्वर पाटील,सचिन लाडवंजारी,मोहन गारुंगे,आर. आर. चौधरी,
यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम