सेवावस्ती विभागातर्फे महिलांकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

महिलांना हेअर स्टाईल, पार्टी वेयर मेकअप , नऊवारी पातळ लुक प्रात्यक्षिक

बातमी शेअर करा...

सेवावस्ती विभागातर्फे महिलांकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
महिलांना हेअर स्टाईल, पार्टी वेयर मेकअप , नऊवारी पातळ लुक प्रात्यक्षिक
जळगाव I प्रतिनिधी

केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभाग अंतर्गत कांचन नगर परिसरातील महिलांसाठी येथे एक दिवसीय मेकअपचे मोफत कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस ब्युटी पार्लर प्रशिक्षिका इंदू फुसे व प्राची चव्हाण यांनी महिलांना हेअर स्टाईल, पार्टी वेयर मेकअप , नऊवारी पातळ लुक प्रात्यक्षिक करून दाखविले.

नवीन बालविकास विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना विसपुते सेवा वस्ती विभाग प्रकल्प सह प्रमुख मनिषा खडके उपस्थित होते. मेकअप कार्यशाळेस ४० महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवा वस्ती विभागातील रवीना भगत, सुनिता
सपकाळे, मेघा सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम