स्नेहमिलन – जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापना दिनानिमित्त स्नेहमिलनाचे आयोजन

४५ वर्षपूर्तीनिमित्त श्री सत्यनारायण महापूजा संपन्न

बातमी शेअर करा...

बातमीदार | रविवार दि २१ जानेवारी २०२४

जळगाव जनता सहकारी बँकेच्या स्थापना दिनानिमित्त स्नेहमिलनाचे आयोजन

४५ वर्षपूर्तीनिमित्त श्री सत्यनारायण महापूजा संपन्न

जळगाव – बँकेच्या स्थापनेस दि. २० जानेवारी २०२४ रोजी ४५ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने बँकेच्या मुख्य कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्थापना दिनाचे औचित्य साधून बँकेचे मुख्यालय “सेवा” येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यालयात बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल यांचे हस्ते श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाली.

स्नेहमिलन
स्नेहमिलन

स्थापना दिनाचे औचित्य साधून ICICI Lombard च्या रिजनल मॅनेजर श्रीमती सेजल संपत व श्रीमती आरती मोरे (सीनियर मॅनेजर) यांनी बँकेसोबत सामंजस्य करार केला.

यावेळी मोठ्या प्रमाणात बँकेचे सभासद, ग्राहक व हितचिंतक तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधींनी व आमदार राजुमामा भोळे यांनी मुख्य कार्यालयात शुभेच्छा दिल्या.

बँक नेहमीच आधुनिक तंत्रज्ञांनाचा वापर करून आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. कार्यक्रमाच्या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, उपाध्यक्ष कृष्णा कामठे, संचालक अनिल राव सर, संचालिका डॉ. सौ आरती हुजुरबाजार,

संचालक हरिश्चंद्र यादव, डॉ अतुल सरोदे, जयंतीलाल सुराणा, विवेक पाटील, सीए नितीन झंवर, संजय प्रभुदेसाई, डॉ. सुरेन्द्र सुरवाडे, हिरालाल सोनवणे, सुशील हासवाणी, सपन झुनझुनवाला, डॉ पराग देवरे,

संचालिका सौ संध्या देशमुख, सीए सुभाष लोहार, जवाहरभाई पटेल, राजेंद्र भारुडे, केशवस्मृति सेवा संस्था समूहाचे प्रमुख भरतदादा अमळकर, बँकेचे माजी अध्यक्ष संजयजी बिर्ला, मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) संजय नागमोती,

वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, कर्मचारी प्रतिनिधी हेमंत चंदनकर, ओंकार पाटील व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याचप्रमाणे दाणाबाजार शाखेचा व स्टेशन रोड शाखेचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी दाणाबाजार शाखेतर्फे रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

https://fb.watch/pJ46VbtfdC/?mibextid=Nif5oz

तसेच रु. ८० लाखाचे कर्ज वितरित करण्यात आले. याप्रसंगी संचालक हिरालाल सोनवणे, सुशील हासवाणी, सौ संध्या देशमुख आदी उपस्थित होते.

स्टेशन रोड शाखेतर्फे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. तसेच रु. १ कोटी २८ लाखाचे कर्ज वितरित करण्यात आले. याप्रसंगी ह.भ.प. मंगेश महाराज जोशी, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, संचालिका सौ संध्या देशमुख आदी उपस्थित होते.

तसेच सर्व शाखांमध्ये बँकेचा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हे ही वाचा👇

आदिवासी कोळी जमातीच्या महाआंदोलनास राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम