स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून प्रौढाने केली आत्महत्या 

भुसावळ शहरातील घटनेने खळबळ

बातमी शेअर करा...

स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून प्रौढाने केली आत्महत्या 

भुसावळ शहरातील घटनेने खळबळ

 

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील गंगाराम प्लॉट भागात सोमवारी (दि. १२ मे) सकाळी ११ वाजेच्या सुमारास कौटुंबिक वादातून एका प्रौढाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येत आहे.

मृत व्यक्तीचे नाव डिगंबर मेंदिराम बढे (वय ५२, रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) असे आहे. ते पत्नीच्या सहवासात राहत होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते आणि त्यामुळे पत्नी माहेरी गेली होती. त्यांच्या मुलीचा विवाह झाला असून ती खडकी (ता. भुसावळ) येथे सासरी राहते.

सोमवारी सकाळी घरात कोणीही नसताना डिगंबर बढे यांनी त्यांच्या खोलीत विनापरवाना बंदुकीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवले. गोळीचा आवाज ऐकताच शेजारी धावत आले आणि त्यांनी ही घटना पाहून पोलीसांना माहिती दिली.

घटनास्थळी भुसावळ बाजारपेठ पोलीस दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनद्वारे घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. प्रारंभीच्या तपासात गोळी थेट डोक्यात घुसल्याचे आणि बंदुकीत केवळ एकच काडतूस असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही बंदूक विनापरवाना असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम