हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांग व्यक्तींना रोजगारनिर्मितीची उत्तम संधी

बातमी शेअर करा...

हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
दिव्यांग व्यक्तींना रोजगारनिर्मितीची उत्तम संधी
जळगाव प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला मान्यता मिळाली आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांच्या स्तरावरून सुरू आहे.

दिव्यांग व्यक्तींना रोजगारनिर्मितीची उत्तम संधी उपलब्ध करणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्यासाठी https://register.mshfdc.co.in ह्या लिंकवर दि. २२ जानेवारी २०२५ रोजी पोर्टल प्रक्षेपित करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ०६ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ कार्यालय यांच्याद्वारे प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम