हिरण विद्यालयाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

हिरण विद्यालयाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कजगाव ता भडगाव येथील बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनि जवाहर नवोदय परीक्षेत व शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे पवन रामदास भालेराव याने जवाहर नवोदय परीक्षेत तर नंदकुमार सुभाष बैरागी याने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे त्यामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे विद्यालयाचे प्राचार्य एम के पवार पर्यवेक्षक जी टी पाटील शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांच्या कडून उत्तीर्ण विद्यार्थी पवन रामदास भालेराव व नंदकुमार सुभाष बैरागी यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला .तसेच त्याच्या घवघवीत यशासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच संस्थेचे अध्यक्ष मंगेश पाटील उपाध्यक्ष दिनकरराव पाटील सचिव रत्नाबाई पाटील सहसचिव पंजाबराव देवकर व संस्थेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे

बातमी शेअर करा...
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम