हुंड्याच्या कारणावरून लग्न मोडले

बातमी शेअर करा...

हुंड्याच्या कारणावरून लग्न मोडले

तरुणीला मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी) – हुंड्यासाठी पाच तोळे सोने व संसारोपयोगी वस्तू न दिल्याच्या कारणावरून एका २८ वर्षीय तरुणीचे लग्न मोडण्यात आले तसेच तिला मारहाण व शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुणे व जळगाव येथे १८ जानेवारी ते ३० मार्च दरम्यान घडला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निमखेडी शिवारातील पीडित तरुणी पुण्यात नोकरी करते. तिचे लग्न ठरले असताना वर पक्षाकडून हुंड्याच्या स्वरूपात पाच तोळे सोने आणि इतर संसारोपयोगी वस्तूंची मागणी करण्यात आली होती. या मागणीला नकार दिल्यामुळे तरुणीवर दबाव टाकण्यात येत होता. दरम्यान, तरुणीने वधूपक्षाकडून दिलेल्या काही वस्तू परत घेण्यासाठी पुण्यातील निवासस्थानी गेली असता, तिला वर पक्षातील चार जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडितेच्या फिर्यादीवरून आकाश राजेश कांबळे, राजेश कांबळे, कविता राजेश कांबळे आणि किरण राजेश कांबळे (सर्व रा. बीएसएनएल क्वॉर्टर, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम