
हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे बक्षीस वितरण व आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा थाटात
शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते 25 शिक्षकांना पुरस्कार प्रदान...
हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे बक्षीस वितरण व आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा थाटात
शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते 25 शिक्षकांना पुरस्कार प्रदान…
छत्रपती संभाजीनगर I प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे सलग 11व्या वर्षीही हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फे शिक्षकांसाठी ईद ए मिलादुन्नबीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती
. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना पारितोषिक व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले तसेच शिक्षकांमधून उत्कृष्ट शैक्षणिक करू करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमचे मार्गदर्शक तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे , तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण , माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी लाटकर मॅम, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीसोफी अहमद लइक, ॲड. खिजर पटेल साहेब, प्रमुख उपस्थिती सिल्लोडचे माजी नगरसेवक कॉ. शेख बाबू आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली. सर्वप्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांचे हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनच्या परंपरेनुसार सर्वाना पुस्तक व शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. प्रथम ईद मिलादून्नबी निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील अनुक्रमाने प्रथम, द्वितीय अणि तृतीय विजेत्यांना एक पुस्तक, शानदार ट्राफी, सन्मान पत्र व रोख रक्कमेचे बक्षिसे देण्यात आली. तसेच या वर्षी 4 प्रोत्साहनपर बक्षिसे अनुक्रमे देण्यात आले. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक-शिक्षिका पुरस्कार 2024 राज्यातून 8 शिक्षकांना देण्यात आले. तसेच 8 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वाटप करण्यात आले.
सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षिकांना मान्यवराच्या हस्ते शानदार ट्राफी, सन्मान पत्र एक पुस्तक आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर येथे हा सोहळा थाटात व मोठ्या उत्साहात पार पडला,कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सय्यद मुंतजिब चिश्ती सर यांनी केले तर प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात शिक्षक आमदार श्री.विक्रमजी काळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. अध्यक्षीय भाषणात शिक्षक आमदार म्हणाले की हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनचे प्रत्येक कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे
तसेच शिक्षकांनी आपली जबाबदारी खंबीरपणे पाळावी. हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनच्या सर्व टीम व विशेषकरून रहीम सरांचे अभिनंदन करत ते म्हणाले की त्यांनी इतके चांगले उपक्रम यशस्वीपणे राबविलेले आहेत. हे शिक्षकांना प्रेरणा देण्याचे कार्य 11वर्षापासून करीत ते करीत आहेत. मी खंबीरपणे हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनच्या सोबत आहे. आभार प्रदर्शन शफिक पठाण सर यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये शिक्षक -शिक्षिका, मित्र परिवार तसेच शैक्षणिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व शिक्षक-शिक्षिकांनी जेवणाचा आस्वाद घेतला.या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, शेख शब्बीर ,शफीक पठाण, सय्यद ताजीम,शाहरुख पठाण, ॲड. इरफान खान, शेख जफर, शेख साबीर, शेख यासेर, फरमान खान, शेख अलीम, शाहीन नाज, फैसल खान अहेमद, इम्रान खान, अरमान शेख, सय्यद तसलीम, शेख अजहर, शारेक सय्यद, रिजवान, आदींनी प्रयत्न केले…

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम