हॉलीबॉल स्पर्धा – प्रताप विद्यामंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात

१०६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

बातमी शेअर करा...

बातमीदार |दि १४ जानेवारी २०२४

हॉलीबॉल स्पर्धा – प्रताप विद्यामंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात 

१०६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

चोपडा – येथील प्रताप विद्यामंदिरच्या १०६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत विद्यालयातील सर्व माजी खेळाडू यांच्या शिवबा स्पोर्टस अकॅडमीच्या वतीने खुल्या गटातील भव्य पासींग हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत तब्बल १२ संघांनी सहभाग नोंदवीत उत्साहात स्पर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे संचालक व चोपडा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी, संस्थेच्या कला व क्रीडा विभागावर सदोदित प्रेम करणारे योगीभाई मयूर, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांतभाई गुजराथी,

हॉलीबॉल स्पर्धा

महाराष्ट्र राज्य हॉलीबॉलचे असोसिएशनचे प्रा.देवदत्त पाटील (अमळनेर), महाराष्ट्र राज्य डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे जळगाव जिल्हा सचिव सचिनभाऊ पाटील, (अमळनेर) संस्थेचे समन्वयक गोविंद भाई गुजराथी, डी.टी.महाजन, विद्यालयाचे पर्यवेक्षक पी.डी.पाटील, एस.एस.पाटील, ए.एन.भट यांच्या समवेत अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

सदर स्पर्धेला प्रथम पारितोषिक रोख रक्कम सात हजार रुपये संस्थेचे संचालक व माजी उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी तर द्वितीय पारितोषिक चोपडा नगरीतील प्रसिद्ध बिल्डर बोल बजरंग लँड अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक भाऊ महाजन

तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम तीन हजार रुपये प्रताप विद्या मंदिराचे ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य योगेश शेलार यांच्या वतीने तर प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी स्वरूपात मातोश्री फुल भंडारचे संचालक रवींद्र भाऊ महाजन यांच्या वतीने भेट देण्यात आली.

सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नाशिक रेंज महाराष्ट्र पोलीस संघाने तर द्वितीय क्रमांक शिवबा स्पोर्ट्स अकॅडमी आणि तृतीय क्रमांक शिरपूर तालुक्यातील बोराडी या संघाने पटकाविले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी चोपड्यात नव्यानेच नियुक्त झालेले पोलीस अधिकारी भुसरे यांची देखील उपस्थिती लाभली.

स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी चोपडा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष भूपेंद्रभाई गुजराथी यांनी सर्व खेळाडूंना आपल्या मनोगतातून शुभेच्छा देत खेळाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करीत खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडण्याचे आवाहन केले.

सदर स्पर्धेचे पंच म्हणून व्हॉलीबॉल खेळाचे दिग्गज खेळाडू भुसावळ येथील सुरज वराडे ,अंमळनेर येथील जयेश मासरे,चोपडा येथील योगेश शिरसाट,निखिल धनगर यांनी काम बघितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन तर आभार प्रदर्शन शिवबा स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष समाधान माळी यांनी केले.

सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शिवबा स्पोर्ट्स अकॅडमी चे हर्षवर्धन पवार, प्रथमेश शिंदे, शुभम साळी, उमंग सोनवणे, चेतन माळी, गिरीश राजपूत, चेतन गाडी लोहार, प्रथमेश महाजन,

आयुष धनगर, प्रज्ञा महाजन, ऋतुजा पाटील, मोहिनी महाजन, ललित महाजन या विद्यालयातील माजी खेळाडूंची मोलाचे सहकार्य लाभले.

हे वाचा👇

चोपडा महाविद्यालयात ‘युवा मॅरेथॉन स्पर्धा’ उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम