११ वी प्रवेशासाठी विद्यार्थाच्या  पालकांनी वर्गाला लावले कुलुप

बातमी शेअर करा...

११ वी प्रवेशासाठी विद्यार्थाच्या  पालकांनी वर्गाला लावले कुलुप
मोठे वाघोदा प्रतिनिधी. महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यामध्ये इ. ११ वी साठी ऑनलाईन प्रवेशाच्या पद्धतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहे, याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थांना भेटत आहे मोठे वाघोदे येथे मुलींना शिक्षणासाठी बाहेर जाता येत नसल्यामुळे शाळेत विज्ञान शाखा सुरु करण्यात आलेली होती, परंतु आता ज्या मुलींसाठी वर्ग सुरु करण्यात आले त्याच मुली मेरीट लिस्टमुळे प्रवेशापासून वंचित राहत आहेत.

फेरीची प्रक्रिया सुरु झालेल्या असून आमची मुले-मुली आता कुठे जातील प्रवेशापासून वंचित राहतील की काय या भीतीने गावातील आई व वडीलांनी थेट विद्यालय गाठले व मुख्याध्यापक शिक्षक व संचालक मंडळा कडे आपल्या तक्रारी मांडल्या त्यामध्ये मुला-मुलींच्या काळजीपोटी व मोलमजूरी करण्या-या पालकांची अर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही आमच्या पाल्यांना शिक्षणासाठी लांब पाठवू शकत नाही,त्यांचे शिक्षण 5 वी पासुन याच विद्यालयात झाले आहे त्याला येथेच प्रवेश मिळावा यासाठी सर्व माता पिता आग्रही झाल्या आमच्या पाल्यांना इ. ११ वी मध्ये प्रवेश द्या अन्यथा आम्ही 11 वी चा वर्ग उघडु देणार नाही असा वर्गाला कुलूप लाऊन संताप व्यक्त केला ,ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर पालकांनी व शिक्षकांनीही रोष व्यक्त केला, संस्थेच्या मंडळातर्फे कुलदीप पाटील पी एल महाजन यांनी विद्यालयात येऊन समजुत काढली व सचीव किशोर पाटील यांचे आमदार चंद्रकात पाटील व गिरीष महाजन यांच्याशी या संदर्भात बोलणे झाले आहे असे सांगितले तसेच आपल्या विद्यालयातून १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश करुन घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे व‌ करु असे आश्वासन पालकांना दिले,
महीला व पालकांनी आम्ही आमदारकडे स्वता जाऊ व तक्रार करु असा ठाण मांडला तर विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकांनीही आम्ही पण सहकार्य करू असे आश्वासन दिले पालकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम