कै रविंद्र पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ १२ वी च्या दोन विद्यार्थ्यांना २१०० चे बक्षीस

१२ वी विज्ञान शाखेतील शेतकी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थांसाठी ₹ २१००/ चे बक्षीस जाहीर

बातमी शेअर करा...

बातमीदार |दि ५ जानेवारी २०२४

कै रविंद्र पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ १२ वी च्या दोन विद्यार्थ्यांना २१०० चे बक्षीस

गौरव पाटील यांच्यातर्फे त्यांचे वडील कै प्रा रविंद्र पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रताप विद्या मंदिर मधील १२ वी विज्ञान शाखेतील शेतकी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थांसाठी ₹ २१००/ चे बक्षीस जाहीर केले आहेत.

सदर बक्षीस शाळेच्या वर्धापन दि ९ जानेवारी रोजी वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास गौरव पाटील, अनिल पाटील व चोपडा तालुक्याचे सुप्रसिध्द भुलतज्ञ डॉ नरेंद्र पाटील यांनी उपस्थिती द्यावी अशी विनंती शाळेतर्फे करण्यात आली आहे.

प्रताप विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत आपले वडील कै प्रा रविंद्र पाटील यांनी शिक्षण घेतले होते. त्यामुळे शाळेवर असलेल्या श्रध्दा व प्रेमळ भावनेतून शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून, शाळेचे विद्यार्थी कै. प्रा. रविंद्र मुरलीधर पाटील यांच्या स्मृति प्रित्यर्थ गौरव रविंद्र पाटील रा. कुवे ता. शिरपूर जि धुळे

याने वडिलांच्या नावाने शाळेतील विद्यार्थांसाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने रु. २१००/- चे बक्षिस इ. १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत शाळेत शेतकी विषयांत सर्वप्रथम येणा-या विद्यार्थ्यांस जाहिर केलेले आहे.

त्याची दखल घेत शाळेने गौरव पाटील यास सालाबादप्रमाणे शालेय वर्धापन दिन दि. ९ जानेवारी, २०२४ मंगळवार, रोजी साजरा होत आहे. त्यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन केले असून पत्राद्वारे शाळा व विद्यार्थ्यांप्रती दाखविलेल्या प्रेम व आदरबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

हा व्हिडिओ पाहा

सदर बक्षीस या वर्षी इ. १२ वी फेब्रु – मार्च-२०२३ परीक्षेत चि. सचिन सुनिल सपकाळे व कु. वैष्णवी दत्तात्रय पाटील या दोन विद्यार्थ्यांना शेतकी विषयात १०० पैकी ९८ समान गुण मिळाले आहेत.

दोन्ही विद्यार्थ्यांना दि. ७ जानेवारी २०२४, रविवार, रोजी सकाळी ठिक ८.०० वाजता होणाऱ्या बक्षीस वितरण समारंभा वेळी प्रत्येकी रु.१०५०/- प्रमाणे स्वतंत्र बक्षीस वितरित करण्यात येणार आहे.

हे वाचा

भडगाव शहरातील मेन रोडवर अवजड वाहनांना बंदी करा अन्यथा अंदोलन : तालुकाध्यक्ष दिनेश महाजन

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम