२५ लाखांच्या इनामी नक्षली रेणुकाचा खात्मा

बातमी शेअर करा...

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश

रायपूर (प्रतिनिधी) : छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि विजापूर सीमेवर असलेल्या एकेली आणि बेलणार परिसरात आज (३१ मार्च) सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या कारवाईत २५ लाख रुपयांच्या इनामी नक्षली रेणुका ऊर्फ बानूचा खात्मा करण्यात आला आहे.

छत्तीसगड पोलिसांच्या डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड) पथकाने नक्षलविरोधी अभियान सुरू असताना ही चकमक घडली. सुरक्षा दलाने INSAS रायफल, मोठ्या प्रमाणात दारुगोळा, शस्त्रे आणि नक्षलींच्या दैनंदिन वापराच्या वस्तू जप्त केल्या आहेत.


ठार झालेली नक्षली रेणुका ऊर्फ बानू ही तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील कडवेंडी गावाची रहिवासी होती. ती DKSZ आणि SZCM च्या प्रेस टीमची प्रभारी म्हणून कार्यरत होती. त्यामुळे ही कारवाई नक्षली संघटनेसाठी मोठा धक्का मानली जात आहे.


घटनास्थळी अद्यापही चकमक सुरू असून आणखी काही नक्षलवादी ठार झाल्याची शक्यता सुरक्षा दलाने वर्तवली आहे. शनिवारी (३० मार्च) सुकमा जिल्ह्यात १७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर २० मार्च रोजी विजापूर, दंतेवाडा आणि कांकेरमध्ये ३० नक्षली ठार करण्यात आले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम