७ व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश

सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत महाराष्ट्राला गौरव

बातमी शेअर करा...

७ व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेचे तिहेरी यश

सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत महाराष्ट्राला गौरव

जळगाव प्रतिनिधी l दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ७ व्या खेलो इंडिया क्रीडा – २०२५ स्पर्धेत ट्रॅक सायकलिंग प्रकारात जळगावच्या आकांक्षा गोरख म्हेत्रे हिने जबरदस्त कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक जिंकत तिहेरी यश मिळवले आहे. मुलींच्या गटात तिच्या यशामुळे महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले असून, येत्या १३ व १४ मे रोजी बिहारमधील पटणा येथे होणाऱ्या रोड सायकलिंग स्पर्धेत ती आत्मविश्वासाने सहभागी होणार आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात ६ ते ८ मे दरम्यान पार पडलेल्या ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत देशभरातील २१ राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आकांक्षाने:

स्क्रॅच रेस (७.५ किमी) मध्ये ११ मिनिटे ५१.६४९ सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक

टाईम ट्रायल प्रकारात ३८.७४२ सेकंद वेळेसह रौप्य पदक

आणि स्प्रिंट प्रकारात वेग व क्षमतेच्या जोरावर सुवर्ण पदक पटकावले.

तसेच अंतिम दिवशी ‘केरिन’ प्रकारात अटीतटीच्या स्पर्धेत ती चौथ्या स्थानी राहिली. तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तिला आगामी रोड सायकलिंग स्पर्धेसाठी थेट निवड मिळाली आहे.

जळगावची कन्या, महाराष्ट्राचा अभिमान

आकांक्षा म्हेत्रे ही जैन इरिगेशन कंपनीत कार्यरत असलेले गोरख म्हेत्रे व अंजली म्हेत्रे यांची कन्या असून, तिच्या या यशाबद्दल जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापक संचालक अजित जैन, अतुल जैन यांच्यासह संपूर्ण जैन कुटुंबीयांनी तिचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम