
अंधारात उभ्या मालवाहू वाहनावर धडकलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
अंधारात उभ्या मालवाहू वाहनावर धडकलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू
जळगाव : अंधारात उभ्या मालवाहून
वाहनावर कामावरुन घरी जात असलेल्या प्रौढाची दुचाकी आदळून शिवाजी लोभाजी दळवी (वय ५०, रा. तेजस पार्क, आव्हाणे शिवार) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. २६ रोजी घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आव्हाणे शिवारातील तेजस पार्क येथे शिवाजी लोभाजी दळवी हे वास्तवयस होते. दि. ११ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास ते (एमएच १९, बीएल ३३७३) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी कानळदा रोडवर लक्ष्मी
नगर जवळ अंधारात रस्त्यावर एक मालवाहू वाहन उभे होते. या वाहनावर दळवी यांच्या दुचाकी आदळून अपघात झाला होता. यामध्ये शिवाजी दळवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते.
पंधरा दिवसांपासून सुरु होते उपचार
गेल्या पंधरा दिवसांपासून अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवाजी दळवी यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांची मृत्यूसोबत सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम