अंबरनाथ येथे महाराष्ट्रातील पहिले साहित्य उद्यान विकासासाठी 1.75 कोटींच्या निधीची मागणी
माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी आ. बालाजी किणीकर यांच्यासह मुख्याधिकाऱ्यांकडे केली निधीची मागणी
मुंबई । प्रतिनिधी
अंबरनाथमधील प्रसिद्ध “पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यान” सुशोभीकरणासाठी आणि विकासासाठी नगरोत्थान अभियानांतर्गत 1.75 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात माजी नगराध्यक्ष तथा नामनिर्देशित सभासद सुनील वामन चौधरी यांनी अंबरनाथ नगरपालिका व नवनिर्वाचित आमदार बालाजी किणीकर यांच्याकडे लेखी पत्र पाठवले आहे.
2015 साली स्थापन झालेले हे उद्यान महाराष्ट्रातील पहिले साहित्य उद्यान म्हणून ओळखले जाते. कविवर्य किरण येले यांच्या संकल्पनेतून आणि सुनील चौधरी यांच्या प्रयत्नांतून हे साकारण्यात आले होते.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन झाले होते. या उद्यानात साहित्य, कला, संगीत, वक्तृत्व अशा विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्याने सुशोभीकरणासाठी विशेष निधी दिल्यास येथे साहित्य संमेलन, कार्यशाळा, कवी संमेलन अशा उपक्रमांना गती मिळेल. त्यामुळे अंबरनाथ शहर “पुस्तकांचे शहर” म्हणून नावारूपाला येईल, असा प्रस्ताव आहे.
साहित्यप्रेमी आणि स्थानिक नागरिकांना या विकासातून नवीन आशा मिळाल्या आहेत, तसेच महाराष्ट्राच्या साहित्य वारशाला एक नवा आयाम मिळेल अशी अपेक्षा आहे.
हे ही वाचा👇
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने केंद्र व राज्य शासनाचे मानले आभार
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम