
अंबरनाथकरांचा कल ‘दूरदृष्टी व शिक्षित नेतृत्वा’कडे !
अंबरनाथकरांचा कल ‘दूरदृष्टी व शिक्षित नेतृत्वा’कडे !
नगराध्यक्ष निवडणुकीनंतर विकासाभिमुख नेतृत्वावर सकारात्मक चर्चा
अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर शहराच्या राजकीय वर्तुळात दूरदृष्टी असलेल्या, शिक्षित आणि विकासाभिमुख नेतृत्वाच्या गरजेवर सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही वर्षांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या व्हिजनरी नेतृत्वाखाली तसेच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अंबरनाथ शहरात पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि विकासकामांना गती मिळाली आहे.
याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या सर्वोच्च पदासाठी उच्चशिक्षित, अभ्यासू आणि प्रशासकीय समज असलेले नेतृत्व मिळाले असते, तर अंबरनाथकरांनी त्याला निश्चितच पसंती दिली असती, असे मत राजकीय निरीक्षक आणि शहरातील जाणकार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषतः डॉ. निमिषा सुनील चौधरी यांच्यासारख्या शिक्षित आणि समकालीन शहरी प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाला संधी मिळाली असती, तर शहराच्या विकासाला अधिक दिशा मिळाली असती, अशी चर्चा होत आहे.कारण माजी नगराध्यक्ष असलेले सुनील चौधरी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेला विकास , पक्षात प्रामाणिक आणि एकनिष्ठ असलेले सुनील चौधरी या डॉ. निमिषा चौधरी यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडून येण्यासाठी कारणीभूत ठरल्या असत्या. सुनील चौधरी यांनी शिवसेनेसाठी शहरात राबविलेले संघटन आणि अंबरनाथकरांसाठी राबविलेल्या विविध उपक्रम हे अंबरनाथकारांच्या लक्षात आहे. तसेच पालिकेच्या ज्या १८ जागांसाठी मतदान झाले असते तर त्या अनुषन्गाने डॉ, मिनिषा चौधरी या हजारोंच्या मताधिक्क्याने निवडून आल्या असत्या . उच्चभ्रू आणि सुशिक्षित मतदारांमध्ये डॉ. मिनिषा चौधरी या पहिल्या पसंती होत्या . त्यांना उत्स्फूर्त मतदान होऊन त्या मोठ्या मताधिक्क्याने निवडून आल्या असत्या अशा चारचा आता अंबरनाथ शहरात सुरु आहे. तसेच चौधरी कुटुंबियांचे शिवसेना पक्षासाठी मिळालेले योगदान पाहता डॉ. निमिषा चौधरी याच सेनेच्या नगराध्यक्षपदी विराजमान होऊन अंबरनाथ शहराच्या विकासाला खासदार , आमदार आणि नगराध्यक्षपदी उच्च शिक्षित डॉक्टर मिळाला असता.
दुसरीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तर राज्य शासनाच्या पातळीवर आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी अंबरनाथसाठी अनेक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत. अशा वेळी नगरपरिषदेच्या नेतृत्वातही डॉ. निमिषा चौधरी यांच्यासारखे शिक्षण, अनुभव आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची क्षमता असलेले नेतृत्व असणे शहराच्या सर्वांगीण प्रगतीस पोषक ठरले असते, असे मत व्यक्त केले जात आहे.
महायुतीतील मित्रपक्षांमध्ये अंबरनाथमध्ये थेट लढत झाली असली, तरी या निवडणुकीतून अंबरनाथकरांचा कल विकास, पारदर्शक प्रशासन आणि सक्षम नेतृत्वाकडे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. गेल्या २५ वर्षांत शिवसेनेने शहराच्या विकासाची भक्कम पायाभरणी केली असून, ही विकासाची परंपरा पुढील काळातही कायम राहील, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
नगराध्यक्ष निवडणुकीचा निकाल केवळ विजय-पराभवाच्या चौकटीत न पाहता, अंबरनाथच्या भविष्यासाठी कोणत्या प्रकारचे नेतृत्व अधिक उपयुक्त ठरेल, यावर सुरू झालेली ही सकारात्मक चर्चा शहराच्या हिताची असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम