
अंबरनाथच्या नियोजित नाट्यगृहात महाराष्ट्रदिनी तिसरी घंटा
अंबरनाथच्या नियोजित नाट्यगृहात महाराष्ट्रदिनी तिसरी घंटा
विविध हौशी नाट्य, बालनाट्य, स्थानिक कलाकारांची नाटके
अंबरनाथ प्रतिनिधी
अंबरनाथच्या सौंदर्यात भर : घालणाऱ्या नियोजित नाट्यगृहात तिसरी घंटा महाराष्ट्रदिनी वाजण्याची शक्यता आहे. नाट्यगृहाची रसिकांना माहिती व्हावी, तिकडे मोठ्या संख्येने रसिकांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी शहरात नाट्य महोत्सवासारख्या उपक्रमांचे आयोजन करून रसिकांना सांस्कृतिक मेजवानी देण्यासाठी येथील नाट्यप्रेमी मंडळी प्रयत्नशील आहेत. नाट्यगृहातील काही किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत.
अंबर भरारीचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. ९) शहरात नाट्य महोत्सवाच्या आयोजनाबाबत नाट्यप्रेमींच्या उपस्थितीत बैठकीचे
आयोजन केले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांच्या सहकार्यातून अंबरनाथला रेल्वे स्थानकापासून जवळच प्रशस्त नाट्यगृहाची निर्मिती केली आहे.
विविध हौशी नाट्य, बालनाट्य, स्थानिक कलाकारांची नाटके, अशा
विविध प्रकारे महोत्सवाद्वारे नाट्यगृहाच्या संदर्भात अनोख्या पद्धतीने जनजागृती केली जाणार आहे. यासंदर्भात पालिका प्रशासक डॉ. रसाळ, मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांची भेट घेणार असल्याचे सुनील चौधरी म्हणाले. कवी किरण येले, दिग्दर्शक महेंद्र पाटील, कौस्तुभसरदेसाई, वासंती सरदेसाई, इंदूताई उपस्थित होते,

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम