अंबरनाथमध्ये केमिकलयुक्त बर्फ़ाच्या गोळ्याची विक्री ; विक्रेत्याची हातगाडी जप्त
युटयूव्ही चॅनलवर व्हिडीओ प्रसारित केल्याबद्दल तक्रारदाराला विक्रेत्याकडून धमक्या
अंबरनाथ I प्रतिनिधी
अंबरनाथमध्ये डोंबिवली जिमखाना चौकात एक नागरिक बर्फाचं गोळा खाण्यास गेला असता बर्फ गोळा हा केमिकल युक्त असल्याचे नागरिकाने सांगून याबाबत लहान मुलांच्या जीवाशी कशाला खेळता असा जाब विचारल्याचा राग आल्याने विक्रेत्याने वाद घालून याचा व्हिडीओ यु ट्यूब चॅनलवर प्रसारित केल्याबद्दल धमक्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून नागरिकांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेने बर्फ गोळ्याची हातगाडी साहित्यासह जप्त केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे कि, मब्रनाथ येथील रहिवाशी असलेले निलेश बोरसे वय ४६ रा. अंबरनाथ हे बर्फ गोळा खाण्यासाठी मुलांसमवेत दि. ९ जानेवारी रोजी हे गेले असता राजपूत नामक बर्फ गोळ्या वाल्याला त्यांनी बर्फात वापरले जाणारे सरबत हे सॅकरीन केमिकल युक्त असल्याचे सांगितल्यावर दोघांमध्ये वाद झाला. यावेळी निलेश बोरसे यांनी हे केमिकल युक्त बर्फ गोळा हे लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगून त्यांनी याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे तात्काळ तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेत डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने येऊन बर्फ गोळा ची हातगाडी व इतर साहित्य जप्त करून नेले. यावेळी घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले होते. याबाबत निलेश बोरसे यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वर या बर्फ गोळ्याची माहिती असलेला व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर संबंधित राजपूत नामक विक्रेत्याने व्हिडिओ डिलीट करण्याची धमकी दिली.
तसेच अन्य एका क्रमांकावरून एका पीएसआय ने धमकी देऊन तुम्हाला खूप महागात पडेल अशी धमकी दिली. त्यावरून निलेश बोरसे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम