अंबरनाथमध्ये कलाकारांचा भव्य मेळावा आणि नवीन नाट्यगृहाचा उत्साहात शुभारंभ

बातमी शेअर करा...

अंबरनाथमध्ये कलाकारांचा भव्य मेळावा आणि नवीन नाट्यगृहाचा उत्साहात शुभारंभ

अंबरनाथ प्रतिनिधी धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहावर बाळ कोल्हटकर रंगमंचास नवे रूप; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

अंबरनाथ (प्रतिनिधी): अंबरनाथ शहरातील सांस्कृतिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरलेला कार्यक्रम २२ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृह, बाळ कोल्हटकर रंगमंच येथे नवीन नाट्यगृहाचा शुभारंभ, दिवाळी फराळ आणि कलाकार मेळावा असा त्रिवेणी सोहळा रंगला.

सकाळी १०.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात नाट्य, सिने, गीत, नृत्य, संगीत, साहित्य, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, लेखक, कवी, महिला व बालकलाकार, व्यावसायिक, पत्रकार, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, निवेदक, दिग्दर्शक आणि संस्था प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण खासदार श्री. श्रीकांतजी शिंदे यांच्या निर्मितीतील नवीन नाट्यगृहाचा शुभारंभ हे ठरले. या निमित्ताने अंबरनाथमधील सर्व स्तरावरील कलाकार, नाट्यरसिक, पत्रकार, “अंबरभरारी” सदस्य आणि नागरिकांनी एकत्र येऊन दिवाळीचा आनंद साजरा केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम