अंबरनाथमध्ये नागरी सुविधा केंद्राच्या विकासासाठी सुमारे २.८४ कोटींचा कार्यादेश मंजूर

'सनबह मल्टीव्हेंचर्स प्रा.लि.निवड

बातमी शेअर करा...

अंबरनाथमध्ये नागरी सुविधा केंद्राच्या विकासासाठी सुमारे २.८४ कोटींचा कार्यादेश मंजूर

‘सनबह मल्टीव्हेंचर्स प्रा.लि.निवड

 

अंबरनाथ (प्रतिनिधी) – अंबरनाथ पूर्वेतील कानसई येथील डी.डी. स्कीम १५ अंतर्गत नागरी सुविधा केंद्र (सिव्होक सेंटर) विकसित करण्यासाठी अंबरनाथ नगरपरिषदेकडून ‘सनबह मल्टीव्हेंचर्स प्रा.लि.’ या कंपनीला सुमारे २.८४ कोटी रुपयांचा कार्यादेश देण्यात आला आहे. या कामासाठी नगरपरिषदेने प्रशासकीय व वित्तीय मंजुरीनंतर निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून सदर कंपनीची निवड केली आहे.

प्रकल्पाची एकूण किंमत जीएसटीसह २,८३,८९,१४३/- रुपये इतकी असून, ही किंमत अंदाजित खर्चापेक्षा ०.१० टक्क्यांनी कमी आहे. संबंधित कंपनीने दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी करारनामा सादर केला असून, सुरक्षा अनामत रक्कम ७,२१,७५८/- रुपये नगरपरिषदेकडे रोख स्वरूपात भरली आहे.

नगरपरिषदेच्या आदेशानुसार, या कामाची मुदत कार्यादेश दिनांकापासून पुढील १२ महिने असणार आहे. या प्रकल्पावर ठाणे येथील शासकीय तंत्रनिकेतनकडून त्रयस्थ लेखा परीक्षण करण्यात येणार असून, संबंधित ठेकेदाराने आवश्यक ती सर्व सहकार्य करणे बंधनकारक राहील.

तसेच, कामाशी संबंधित विमा योजना, ईपीएफ योगदान आणि प्रगतीचा फोटो दस्तऐवजासह सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संपूर्ण कामावर उपअभियंता, बांधकाम विभाग यांचे अधिपत्य राहणार आहे.

नगरपरिषदेकडून दिलेल्या कार्यादेशामुळे स्थानिक नागरी सुविधांच्या विकासाला गती मिळणार असून, कानसई परिसरातील रहिवाशांना या केंद्राचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम