अंबरनाथमध्ये सूर्योदय मैदानाचे नूतनीकरण लवकरच सुरू ; ५ कोटी निधी उपलब्ध

बातमी शेअर करा...

अंबरनाथमध्ये सूर्योदय मैदानाचे नूतनीकरण लवकरच सुरू ; ५ कोटी निधी उपलब्ध

अंबरनाथ प्रतिनिधी – शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने तसेच खासदार संसदरत्न डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ पूर्व, साई विभागातील सूर्योदय मैदानाचे सर्व सोयीसुविधांसह नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी ५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

या कामाबाबत परिसरातील रहिवासी व ज्येष्ठ नागरिकांचे मौल्यवान अभिप्राय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. नागरिकांच्या वतीने मिळालेल्या सूचनांचे निवेदन नगरपालिकेकडे सादर करण्यात येणार आहे.

बैठकीदरम्यान साई सेक्शन, खेर सेक्शन, स्टेशन परिसर आणि कानसई विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनिल वामन चौधरी, नगरसेवक कुणाल भोईर, नगरसेवक संजय अदक, श्री. स्वप्निल बागुल यांची विशेष उपस्थिती होती.

ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख हिंदूराव यांनी नगराध्यक्ष म्हणून सुनील चौधरी यांनी दहा वर्षांपूर्वी मैदान उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या कष्टांचे कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना मैदान आणि विविध विकासकामे मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी नागरिक व ज्येष्ठ मंडळींनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम