अंबरनाथ जैन मंदिरासमोरील पाणी आणि कचरा समस्येवर शिवसेनेचा ‘खंबीर’ तोडगा

बातमी शेअर करा...
अंबरनाथ जैन मंदिरासमोरील पाणी आणि कचरा समस्येवर शिवसेनेचा ‘खंबीर’ तोडगा

अंबरनाथ: शहरातील श्री कच्छी वीसा ओसवाल जैन संघाच्या जैन मंदिरासमोर अनेक दिवसांपासून साचणाऱ्या पावसाचे पाणी आणि कचऱ्याच्या समस्येने जैन समाजाला त्रास होत होता. मंदिरासमोरील रस्त्यावर सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी पेवर ब्लॉक काढल्यामुळे खड्डे पडले होते आणि जवळच असलेल्या कचराकुंडीमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.

​जैन समाजाच्या पर्युषण पर्वाच्या ‘मिच्छामि दुक्कडं’ या क्षमापना दिनाच्या निमित्ताने माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी मंदिराला भेट दिली. यावेळी जैन श्राविका श्रीमती मीनाबेन मनीष गाला आणि इतर महिलांनी त्यांना या गंभीर समस्येबद्दल सांगितले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनील चौधरी यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

​कार्यक्रमानंतर सुनील चौधरी यांनी नगरसेवक कुणाल भोईर यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी त्वरित पेवर ब्लॉक हटवून पावसाचे पाणी थेट गटारात जाण्याची व्यवस्था केली. तसेच, लवकरच कचराकुंडी हटवून सीसीटीव्हीसाठी खोदलेला रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याचे आश्वासनही दिले.

​यावेळी नगरसेवक संजय अदक, स्वप्निल बागुल, जयंतीभाई नागडा, परेशभाई शाह, खांजीभाई धल, हसमुखभाई हरिया, मयूरभाई विसरिया, सुरेशभाई मोता, मिकीनभाई गाला, अरुणभाई वोरा, सुरेंद्र हरिया, निक्षित शहा, जयेश देढिया यांच्यासह जैन समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

​या त्वरित कारवाईबद्दल जैन समाजाने सुनील चौधरी आणि कुणाल भोईर यांचे विशेष आभार मानले. “सुनीलभाई आणि कुणालभाई आमच्यासाठी कधीही, अगदी मध्यरात्रीही उभे राहतात,” असे सांगत नागरिकांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. ‘सुनीलभाई चौधरी – माजी नगराध्यक्ष, जिंदाबाद’ आणि ‘कुणालभाई भोईर, जिंदाबाद’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम