
अंबरनाथ येथे बाळ कोल्हटकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवसाहित्यिकांचा गौरव व हस्तलिखित प्रकाशन उपक्रम
अंबरनाथ येथे बाळ कोल्हटकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवसाहित्यिकांचा गौरव व हस्तलिखित प्रकाशन उपक्रम
अंबरनाथ प्रतिनिधी मराठी नाटकसृष्टीतील अग्रगण्य नाटककार बाळ कोल्हटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अंबरनाथ शहरात एक आगळावेगळा साहित्य उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद अंबरनाथ शाखा आणि अंबर भरारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाद्वारे शहरातील नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत कथासंग्रह, कविता, कादंबरी, ललितलेख, प्रवासवर्णन, नाट्यसंहिता, मुलाखती, चरित्रे तसेच बालसाहित्य, महिला साहित्य, दिव्यांग व आदिवासी साहित्याच्या हस्तलिखितांची मागणी आयोजकांनी केली आहे. प्राप्त हस्तलिखितांमधून निवड झालेल्या लेखकांचा डिसेंबर २०२५ मध्ये सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.
हा सोहळा धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या बाळ कोल्हटकर रंगमंचावर पार पडणार असून, या कार्यक्रमाला कथाकार व पटकथाकार किरण येले अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सिनेलेखक-दिग्दर्शक महेंद्र पाटील उपस्थित राहणार असून, युवाशक्ती अंबरनाथचे अध्यक्ष निखिल चौधरी स्वागताध्यक्ष म्हणून तर माजी नगराध्यक्ष व कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष सुनीलजी चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील.
या उपक्रमाचा उद्देश नवोदित लेखकांना संधी देत त्यांचे लेखन वाचकांसमोर आणणे आणि अनुभवी साहित्यिकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे असा आहे. कथा, कविता, लेख, प्रवासवर्णन किंवा कादंबरीचा अंश पाठविण्यासाठी इच्छुकांनी आपले हस्तलिखित खालील संकलकांकडे पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संपर्कासाठी :
श्रावणी फाटक – ८०८७९८१३२२
अविनाश कुलकर्णी – ८००७२८३३४६
मोहन कुलकर्णी – ९४२०६०७०६०
कमलेश कोशे – ९८६९२७९६८२
या उपक्रमाच्या नियोजन समितीत निलेश पाताडे, माधुरी मोरे, सुचेता गोखले, वासंती सरदेसाई, दिपाली कात्रे, सुरेखा कुलकर्णी, शीतल जोशी, कविता करंबेळकर, सुप्रिया जोगळेकर, रेवती चांसरकर, अर्चना जाधव, मीरा भेंडीगिरी आदी मान्यवरांचा समावेश आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम