अंबरनाथ येथे सूर्योदय मैदान विकास कामासाठी बैठक

बातमी शेअर करा...

अंबरनाथ येथे सूर्योदय मैदान विकास कामासाठी बैठक

अंबरनाथ प्रतिनिधी ;– पूर्व साई विभागातील सूर्योदय मैदानाचे सर्व सोयीसुविधांसह नूतनीकरण लवकरच सुरू होणार असून त्यासाठीची पूर्व बैठक नुकतीच पार पडली. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून मैदानाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून मैदानाचे भव्य गार्डन व सुशोभीकरणाचे काम होणार आहे.

या बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील वामन चौधरी, नगरसेवक कुणाल भोईर, नगरसेवक संजय अदक, स्वप्निल बागुल यांच्यासह साई सेक्शन, खेर सेक्शन, स्टेशन परिसर आणि कानसई विभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख हिंदूराव यांनी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सूर्योदय मैदानासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हे मैदान उपलब्ध झाले तसेच अनेक विकासकामे साकारली गेल्याचे त्यांनी नमूद केले.

नागरिक व ज्येष्ठ मंडळींच्या वतीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम