
अज्ञात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; चालकावर गुन्हा दाखल
अज्ञात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; चालकावर गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी चोपडा ते शिरपूर या मुख्य मार्गावरील काजीपुरा फाट्याजवळ भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत सुनील हिम्मत पाटील (वय ३०, रा. चोपडाई, ता. अमळनेर) या तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. अपघातानंतर घटनेचा तपास सुरु असून, ९ डिसेंबर रोजी चोपडा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील पाटील हे रात्री ११ वाजता आपल्या दुचाकीने (एमएच ५४ ए ५४०७) चोपडा–शिरपूर रोडने जात असताना काजीपुरा फाट्याजवळ समोरून आलेल्या अज्ञात दुचाकीने त्यांच्या वाहनाला प्रचंड धडक दिली. धडक एवढी भीषण होती की सुनील पाटील रस्त्यावर दूर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डोक्याला व शरीराला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तरुणाच्या आकस्मिक मृत्यूने अमळनेर तालुक्यातील चोपडाई गावात शोककळा पसरली आहे.
घटनेनंतर सुनील यांचा भाऊ अमृत हिम्मत पाटील यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघाती मृत्यू घडवल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम