अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; वनविभागाकडून पंचनामा

बातमी शेअर करा...

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; वनविभागाकडून पंचनामा

चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील पिलखोड-नरडाणा फाटा मार्गावरील निंबोळीच्या मळ्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाला.

या घटनेची माहिती मिळताच मालेगाव वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले.

या अपघातामुळे परिसरात वन्यजीवांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, वन्य प्राण्यांना रस्त्यावरून ये-जा करताना येणारा धोका अधोरेखित झाला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम