अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

अडावद-उनपदेव रस्त्यावरील घटना

बातमी शेअर करा...

अज्ञात वाहनांच्या धडकेत युवक ठार
अडावद-उनपदेव रस्त्यावरील घटना

चोपडा प्रतिनिधी
अडावद-उनपदेव रस्त्यावर १५ मार्च रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अमोल संजय महाजन (१८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.

अमोल महाजन हा शेतातून अडावदकडे दुचाकीवरून परतत असताना समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तो जागीच ठार झाला.

अपघातानंतर तातडीने अमोलला अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन सुशीर यांनी त्याला मृत घोषित केले.

अडावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, हवालदार भरत नाईक आणि शुभम बाविस्कर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अज्ञात ट्रकचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम